आपले विनीत
सन १९९४ साली श्री सूर्यकांत नल्लाजी मुंबई मधून पुण्यात स्थायिक झाले, त्यावेळी श्री. विलास सोमाजी यांच्या बरोबर चर्चा करून पिंपरी-चिंचवड मधील आपल्या समाज बांधवांची यादी तयार केली. साधारणतः ३५ ते ४० समाज बांधवांची यादी तयार झाली. पण काही कालावधी गेल्यानंतर सन २००५ रोजी श्री. विलास सोमाजी यांनी श्री. विठ्ठल बरमल्लू, श्री.अशोक लिंगाल, श्री. जयंत बरशेट्टी, श्री. शिरीष पोरेडी, श्रीमती संगीता पोन्नम आणि श्री.अनिल लक्का अश्या सर्व जणांनी मिळून वार्षिक स्नेह संमेलनाची संकल्पना आखली आणि त्यातूनच या तेलगू मन्नेरवारलू ज्ञातगंगा समाज या संस्थेची स्थापना झाली.
तेलुगू मन्नेरवारलू ज्ञातगंगा समाज या संस्थेचा पहिला स्नेह संमेलनाचा कार्यक्रम रविवार दिनांक १५ जानेवारी २००६ रोजी, श्रम शक्ती भवन, बजाज ऑटो समोर, आकुर्डी येथे संपन्न झाला. पहिल्या कार्यक्रमाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी श्री. विलास सोमा यांनी पार पाडली आणि अशा प्रकारे पहिल्या वर्षापासूनच एक चांगला पायंडा पडून गेले १७ वर्ष हि संस्था सर्व गुण संप्पनाने उभी आहे. पहिला कार्यक्रम प्रथम पिंपरी-चिंचवड पर्यत मर्यादित होता, पण त्या कार्यक्रमात उपस्थित असेलले इतर ठिकाणचे समाज बांधव यांच्या आग्रहचा मान राखून हे वार्षिक स्नेह संमेलन हे फक्त पिंपरी-चिंचवड पुरते मर्यदित न ठेवता आपल्या इतर सर्व ठिकाणच्या समाजातील सर्व लोकांसाठी खुले करण्यात आले