जेष्ठ संजीवनी यॊजना
आपल्या समाजातील विखुरलेले ज्ञाती बांधव वर्षातून एकदा तरी एकत्र यावेत त्यांची आपापसात विचारांची देवाण-घेवाण व्हावी या हेतूने प्रेरित होऊन तेलगू मनेर वारू ज्ञातगंगा समाज या संस्थेची स्थापना करण्यात आली व संस्थेच्या माध्यमातून 2007 पासून सातत्याने सोळा वर्षे स्नेहसंमेलन आयोजित करीत आहोत त्याचप्रमाणे भावी काळातही हा कार्यक्रम चालू ठेवण्याचा आमचा माणूस आहे या कार्यक्रम कार्यक्रम राबवत असताना एक बाबींचे गांभीर्य प्रकर्षाने आमच्या लक्षात आले ते म्हणजे आपल्या समाजातील काही ज्येष्ठ समाज बांधवांच्या हाल अपेष्टा व असह्य परिस्थितीत त्यांची जगण्याची धडपड या समस्यांचा समाजाने सखोल अभ्यास केल्यामुळे काही अडचणींचा बोध झाला त्या अडचणींचा उल्लेख प्रामुख्याने खालील प्रमाणे दिसत आहे
मग या समाजातील अशा बंधू-भगिनींना आपल्या परीने मदत करणे आपले कर्तव्य नैतिक जबाबदारी नाही का ?
आम्हाला वरील प्रश्न व विचार सारखे भेडसावीत असताना त्यावर कशाप्रकारे मात करत येईल हा विचार स्वस्त बसू देत नव्हता शेवटी त्या दृष्टीने विचार करत असताना ज्येष्ठ संजीवनी योजना ही संकल्पना उदयास आली आणि आमच्या मनोदय यावर्षीच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी दिनांक 18 जानेवारी 2015 या सर्व समाज बांधवांचे उपस्थितीत मांडला व त्यांच्या तृतीयार्थ वेगळा निधी उभा करावा लागेल असे आवाहन केले असता त्याचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करून समाज बांधवांनी आपापल्या परीने देणगे जाहीर केल्या आम्ही आपल्या समाज बांधवांचा आदेश व आमच्या कर्तुत्वावरील विश्वास पाहून भारावून गेलो अशा प्रकारे या जेष्ठ संजीवनी योजनेचा श्री गणेशा करण्यात आला या योजनेअंतर्गत वर नमूद केलेल्या प्रमुख कारणाची वर्गवारी खालील प्रमाणात करण्यात आली आहे.