सन १९९४ साली श्री सूर्यकांत नल्लाजी मुंबई मधून पुण्यात स्थायिक झाले, त्यावेळी श्री. विलास सोमाजी यांच्या बरोबर चर्चा करून पिंपरी-चिंचवड मधील आपल्या समाज बांधवांची यादी तयार केली. साधारणतः ३५ ते ४० समाज बांधवांची यादी तयार झाली. पण काही कालावधी गेल्यानंतर सन २००५ रोजी श्री. विलास सोमाजी यांनी श्री. विठ्ठल बरमल्लू, श्री.अशोक लिंगाल, श्री. जयंत बरशेट्टी, श्री. शिरीष पोरेडी, श्रीमती संगीता पोन्नम आणि श्री.अनिल लक्का अश्या सर्व जणांनी मिळून वार्षिक स्नेह संमेलनाची संकल्पना आखली आणि त्यातूनच या तेलगू मन्नेरवारलू ज्ञातगंगा समाज या संस्थेची स्थापना झाली.
एखाद्याचे हसण्याचे कारण व्हा